तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने नाराजी : पालिनेच्या महसुलात वाढ होत नसल्याने समस्या आर्थिक समस्या
पेडणे : सध्या पेडणे पालिकेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे पालिका कामगारांच्या पगारासाठी अडचणी येत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पगार रखडलेला आहे. त्यामुळे कामगारांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पेडणे पालिका मंडळ पालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी अपयशी ठरत आहे. गटार व्यवस्था मंजूर होऊनही त्याचे बांधकाम केले जात नाही. पालिकेचा जो महसूल येण्याचा जे स्त्राsत आहे. त्यातून तो महसूल येत नाही. पूर्वी कमी कर्मचारी घेऊन काम होत आहे, आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढली त्यामुळे पगार देताना निधीचा प्रश्न निर्माण झाला. या कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. पालिकेकडे अपेक्षित महसूल गोळा होत नसल्यामुळे पगारासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे असल्याचे चित्र आहे.
निधी नसल्याने पगार देण्यात अडचणी : नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर
पालिकेकडे निधी नसल्यामुळे पगार देण्यास अडचणी येतात. निधी उपलब्ध होईल तसा कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. पालिकेकडून कराची वसुली झाल्यानंतर पगार देण्यात येईल, असे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अलिकडे कर्मचारी संख्या वाढल्यामुळे पगाराचा खर्च वाढला आहे. मात्र त्या प्रमाणात पालिकेच्या महसुलात कसलीच वाढ झाली नाही. पालिका क्षेत्रामध्ये बेकायदेशीर दुकाने, घरे इतर जी बांधकामे आहेत त्यांच्याकडून पालिकेला कसलाच महसूल मिळत नाही. त्यांच्याकडून कर वसूल करण्याबाबत वारंवार पालिका मंडळाच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करूनही त्याची योग्य पद्धतीने कार्यवाही होत नसल्याचे उघड झाले आहे.
कायम कर्मचाऱ्यांना तीन महिने पगार नाही
पेडणे पालिकेत 12 सफाई कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना जून आणि जुलै महिन्याचा पगार दिला नाही. पेडणे पालिकेतील कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने त्यांना मोठी समस्या निर्माण होत आहेत. हाताच्या पोटावर जगणाऱ्या कर्मचाऱ्यांना जगावे कसे, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेण्याबाबत नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकाऱ्यांनी कधीही बैठक घेतली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांना कशा कळणार आणि त्या कोण सोडविणार असा प्रश्न पेडणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला. दुसरीकडे पेडणे पालिका कार्यालय सध्या कादंब बस स्थानकात भाडाच्या जागेत सुरू आहे. दरमहा 35 हजार ऊपये भाडे, पालिका कुठून देणार? हाही आता प्रश्न तयार होत आहे. पालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीचं काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम वर्षभरात हे काम पूर्ण होईल की नाही याची कोणीही साशंकता आहे. जेवढे दिवस नवीन इमारतीचे बांधकाम रखडणार, तेवढा भाड्यापोटी देण्यात येणारा खर्चाचा बोजा पालिकेवर वाढणार आहे.









