संबंधीत कर्मचाऱ्यांना मिळणार 12 टक्क्यांपर्यंत वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 12 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 2022-23 मध्ये, भारतीय स्टार्टअप्सनी सरासरी 8-12 टक्के पगारवाढ दिली आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की गेल्या आर्थिक वर्षात रोख वेतनात कमी वाढ झाली होती आणि जवळपास 50 टक्के कंपन्यांनी नेतृत्व पदावरील व्यक्तिंना अतिरिक्त इक्विटी अनुदान देऊ केले होते.
एलिव्हेशन कॅपिटलचे उपाध्यक्ष (टॅलेंट), कॅलन एच. म्हणतात, ‘प्रमाणावरील आव्हाने पाहता, भारतीय स्टार्टअप्स महागाईच्या अनुषंगाने पगार वाढवून प्रतिभावान लोकांना नोकरीवर ठेवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी पगारवाढ ही यंदा लहान ते मध्यम स्टार्टअपमध्ये सामान्य आहे.
नेतृत्वाच्या पदांवर असलेल्यांना कंपनीच्या इक्विटीपैकी 0.2 टक्के ते 1.5 टक्के वाटा मिळायला हवा. याव्यतिरिक्त, ते 2023 मध्ये नेतृत्व भूमिकांसाठी पगार वाढीच्या उद्देशाने वेगळ्या साधनाचा विचार करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.









