वार्ताहर/ लाटंबार्से
साळ खालचावाडा येथील श्री महादेव मंदिर व वरचावाडा येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांकडून शिवलिंगावर दूग्धाभिषेक करून महाशिवरात्री उतसाहत साजरी करण्यात आली.
सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांकडून मंदिरात पुरोहित यशवंत गाडगीळ, पुरोहित शंकर गाडगीळ व पुरोहित शांताराम भावे यांच्याकरवी भाविकांकडून श्री गणेश पूजन नंतर शिवपिंडीवर दुग्धाभिषेक तसेच बिल्वदलानी अभिषेक करण्यात आला. हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालू होता .
महाशिवरात्रीनिमित्त श्री महादेव मंदिरात साळ, कुमयामळा, खोलपेवाडी ,धुमासे, वडावल , साळ पुनर्वसन तसेच पंचक्रोशीतील इतर गावातील नागरिक मोठ्या संख्येने श्री महादेव मंदिरात उपस्थित राहून शिवपिंडीवर अभिषेक केला. श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी उसळली होती. यामुळे एकावेळी पंधरा भाविकांकडून अभिषेक कार्यक्रम पार पाडत होता.
संध्याकाळी 7 वाजता झोळमे येथील वझे बुवा यांचे साळ येथील शिष्याकरवी हरिपाठ झाला. तसेच साळ पंचक्रोशीतील भजनी कलाकारांकडून रात्री 9.30 वाजता भजनाचा कार्यक्रम झाला.









