वार्ताहर/किणये
सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्राथमिक मराठी शाळा किणयेच्या विद्यार्थिनींनी कुस्ती यश मिळवले आहे. या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या 42 किलो वजनी गटात साक्षी दळवीने प्रथम तर श्रावणी डुकरेने 46 किलो वजनी गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकविला. या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.









