भारताची स्टार कुस्तीपटू साक्षी मलिकने महिला कुस्तीपटूंच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात केलेल्या आंदोलनातून आज माघार घेऊन आपल्या उत्तर रेल्वेच्या सेवेत परत रुजू झाली आहे. शनिवारी संध्याकाळी कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर दोनच दिवसांनी यात आंदोलनात फूट पडल्याचे दिसून आले आहे.
शनिवारी रात्री उशिरा दिल्लीतील गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी उचलून धरली होती.
साक्षी मलिकचे पती आणि आंतरराष्ट्रिय कुस्तीपटू सत्यव्रत कादियान यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली कुस्तीपटूंची बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसून कुस्तीपटूंना गृहमंत्र्यांकडून हवी असलेली मागणी न मान्य झाली नसल्याचे सांगितले आहे.”
यापुर्वी महिला कुस्तीपटू आंदोलकांनी आपली सर्व आंतरराष्ट्रीय पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेऊन हरिद्वारला जमले होते. त्यांना शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी असे करण्यापासून रोखले होते. तसेच भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना 9 जूनपूर्वी अटक करण्याची मागणी करून सरकारला अल्टिमेटम देऊन परतले होते..
रेलवेमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) पदावर असलेल्या साक्षी मलिक यांच्यासह बजरंह पुनिया यांनाही रेलवे कडून आपल्या गैरहजरी बद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर निषेध करणे हा आपला लोकशाही अधिकार असल्याचेही खेळाडूंनी सांगितले होते.








