केएलएस आयएमएआर तर्फे शुभेच्छा
बेळगाव : गुजरात येथे होणाऱ्या 54 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक संघात बेळगावच्या केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची विद्यार्थिनी साक्षी माळी हिची निवड झाली आहे. गुजरातमधील भुज येथे होणाऱ्या 54 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक संघ भाग घेणार असून या संघात बेळगावच्या आयएमईआरची विद्यार्थिनी साक्षी माळी याची संघात वर्णी लागली आहे. त्याबद्दल केएलएस आयएमईआरचे चेअरमन आर एस मुतालिक, आयएमईआरचे डायरेक्टर डॉ. अरिफ शेख यांच्या हस्ते साक्षी माळीला शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. तिला क्रीडा निर्देशक डॉ. जॉर्ज रॉड्रिक्स यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांचे संघ सहभागी होत आहेत.









