जागा उपलब्ध करून देताना झाली नगरपालिकेची दमछाक. 150 ते 200 नवीन विक्रते दाखल. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून पालिकेचे पाऊल.
डिचोली/प्रतिनिधी
साखळीत दर सोमवारी भरणाऱया आठवडा बाजारावेळी बाजारातील रस्त्यांवर उडणाऱया वाहतुकीचा फज्जा नियंत्रणात आणण्यासाठी साखळी नगरपालीकेने केलेल्या नवीन व्यवस्थेला चांगला प्रतिसाद लाभला. परंतु बाजारात ऐनवेळी सकाळीच जागा मिळत असल्याने एरव्हीपेक्षा 150 ते 200 विपेते अधिक उपस्थित राहिल्याने जागेच्या विषयावरून गोधळ उडाला. नगराध्यक्ष राजेश सावळ व इतरांनी बाजारात फिरून या विपेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. या नवीन व्यवस्थेचे मात्र साखळी बाजारात येणाऱया लोकांनी कौतुक केले.
सोमवारी आठवडा बाजारात पारंपरिक विपेत्यांसह त्यांचे नातेवाईक परिवरातील लोक विपेते म्हणून दाखल झाले. या बाजारात पारंपारिक बसणाऱया विपेत्यांना पालिकेने जागा दिली होतीच. परंतु या नवीन उपस्थित झालेल्या विपेत्यांमुळे पूर्णतः धांदल उडाली. जागेच्या विषयावर गोंधळच झाला. त्यात स्थानिक विपेत्यांकडून त्यांना अपुरी जागा दिल्याने काही प्रमाणात नाराजीही व्यक्त करण्यात आली. या सर्व रूसव्या फुगव्यांवर मात करीत नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी स्वतः पालिका निरिक्षक बसप्पा व इतर कर्मचाऱयांना बरोबर घेऊन या नवीन विपेत्यांना तडजोड करीत जागा उपलब्ध करून दिली. नगराध्यक्ष सावळ हे नगरपालिका निरिक्षक व कर्मचाऱयांसह सकाळी 6 वा. पासून बाजारात उपस्थित होते.
मासळी बाजारच्या बाजूला स्वतंत्र बाजाराची निर्मिती
साखळी बाजारात दर सोमवारी भरणाऱया आठवडा बाजारात रस्त्याच्या बाजूला दुतर्फा विपेते आपली दुकाने थाटत असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत होती. संध्याकाळच्या वेळी तर बाजारात मोठय़ा संख्येने लोक सामान खरेदीसाठी येत असल्याने वाहतूक खंडीतच होत होती. या समस्येवर उपाय म्हणून साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांच्या पुढाकाराने मासळी बाजाराच्या बाजूला असलेली खुली जागा मातीचा भराव घालून व सपाटीकरण करून बाजारासाठी तयार करण्यात आली.
रस्ता विपेतेमुक्त झाल्याने वाहतूक सुरळीत
साखळी बाजारातील रस्ता हा दुतर्फा बसणाऱया विपेत्यांमुळे सदैव व्यस्त असायचा. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीत सदैव अडथळा निर्माण व्हायचा आणि त्याचा त्रास या बाजारास येणाऱया ग्राहकांना होत होता. संध्याकाळच्या वेळी तर बाजारात दुचाकी सुध्दा आणणे शक्मय नव्हते. याचा पूर्णपणे विचार करून या नवीन बाजाराची संकल्पना समोर आली. तिची अंमलबजावणी करताना विनय पांगम यांच्या दुकानाकडून थेट बाजारात मैदानापर्यंत बसणाऱया विपेत्यांना हटवून रस्त्याच्या बाहेर जागा देण्यात आली. त्यामुळे आता या रस्त्यावर दुचाकी व चारचाकीही वाहने सुरळीतपणे हाकणे लोकांना शक्मय झाले.
बाजारात सर्व घटकांना मुक्तपणे फिरता यावे हाच उद्देश – नगराध्यक्ष राजेश सावळ
साखळीचा बाजार हा एकेकाळी सर्वात प्रसिध्द आणि लोकांच्या गर्दीने फुलणारा बाजार म्हणून प्रसिद्ध होता. परंतु या बाजारात ऊडणारा.वाहतुकीचा फज्जा, लोकांना मुक्तपणे संचार करण्यास येणाऱया बाधा यामुळे लोकांची गर्दी कमी झाली होती. त्याचा फटका येथील बाजरपेठेवरही झाला आहे. या बाजाराची तीच रया पुन्हा आणण्यासाठी नगरपालिकेतर्फे हा प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग संध्याकाळपर्यंत यशस्वी झालेला आहे. काही प्रमाणात बदल या बाजारात घडवायचे आहेत. ते येत्या एक दोन आठवडा बाजारात केले जाणार असून त्यानंतर हा बाजार आणि बाजारातील वाहतुकही सुरळीत होणार आहे. यासाठी प्रत्येक साखळीवासीयाचे सकारात्मक आवश्यक आहे, असे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी म्हटले.
स्थानिकांना बाजारात प्रथम प्राधान्य हवे – नगरसेवक आनंद काणेकर.
साखळी बाजार हा स्थानिक विपेत्यांनी मोठा केलेला बाजार असून या बाजारातील स्थानिक विपेत्याचे स्थान राखून व अबाधित ठेवले पाहिजे. बाजारात जागा वाटप चालल्याचे समजताच मोठय़ा संख्येने बिगरगोमंतकीय विपेते जरी दाखल झाले असले तरी त्यांचे लाड न करता स्थानिक विपेत्यांना बसण्यास आणि जाग्याच्या संरक्षणात प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. अतिरिक्त दाखल झालेले विपेते हे पूर्वी बसणाऱया विपेत्यांचेच नातेवाईक असून तेच चार पाच ठिकाणी जागा मागत आहेत. त्यांना अशा जागा न देता त्या स्थानिक विपेत्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नगरसेवक आनंद काणेकर यांनी केली.
बाजारात नवीन सुसज्ज मार्केट प्रकल्प येणार – नगरसेवक दयानंद बोर्येकर
सध्या नवीन बाजार थाटण्यात आलेल्या ठिकाणी सुमारे 20 कोटी रू. खर्चून सरकारतर्फे नवीन सुसज्ज मार्केट प्रकल्प लवकरच येणार आहे. त्याची पायाभरणी येणाऱया दिवसांमध्ये घातली जाणार आहे. सदर प्रकल्पात सर्व बाजार समाविष्ट केला जाणार आहे. आठवडा बाजारलाही येणाऱयांसाठी जागा दिली जाणार आहे. त्यानंतर बाजारातील अनेक समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती नगरसेवक दयानंद बोर्येकर यांनी दिली.









