अक्षय कुमार अन् सैफ अली खान मुख्य भूमिकेत
17 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची जोडी दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा चित्रपट ‘हैवान’द्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. हैवानमध्ये आता एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.
हैवान हा एक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. भूत बंगला आणि हेरा फेरी 3 नंतर दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हा भयपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटात सैयामी खेरचे नाव जोडले गेले आहे. सैयामी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत काम करणार आहे. यापूर्वी ती अभिनेता सनी देओलसोबत जाट या चित्रपटात दिसून आली होती. सैयामीसोबत या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसून येणार आहे, परंतु तिचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. हैवान चित्रपटात दिग्गज कलाकार असरानी हे दिसून येणार आहेत. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याचे समजते.









