अश्विनी अय्यर यांचे दिग्दर्शन
बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेर लवकरच अश्विनी अय्यर तिवारी यांच्याकडून दिग्दर्शित ‘फाडू’ या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. ‘निल बटे सन्नाटा’, ‘बरेली की बर्फी’ आणि ‘पंगा’ यासारखे उत्तम चित्रपट साकारणाऱया अश्विनी अय्यर तिवारी यांचे हे डिजिटल पदार्पण असणार आहे. ही सीरिज चित्रपटातील कला तसेच सांस्कृतिक जगताचे सत्य मांडणारी आहे.
फाडू यासारख्या सीरिजमध्ये काम केलयाने एक कलाकार म्हणून स्वतःचे क्षीतिज व्यापक करण्यास मदत मिळू शकते. फाडू सीरिजने बरेच काही शिकण्यास मदत केली असल्याचे सैयामीने म्हटले आहे. या सीरिजमध्ये सैयामीसोबत पावेल गुलाटी देखील मुख्य भूमिकेत आहे.

अश्विनी अय्यर तिवारी यासारख्या दिग्दर्शिकेसोबत काम करण्याची माझी इच्छा होती. त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये नेहमीच महिला व्यक्तिरेखा मजबूत असते. या संधीसाठी मी अत्यंत आभारी असून याकरता सर्वोत्तम योगदान देणार असल्याचे सैयामीचे सांगणे आहे. ही सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
सैयामी याचबरोबर ‘घूमर’ या चित्रपटात दिसून येणार आहे. यात सैयामीसोबत अभिषेक बच्चन काम करत आहे. यापूर्वी दोघेही ‘ब्रीद ः इन टू द शॅडो’मध्ये एकत्र दिसून आले होते. ‘घूमर’मध्ये सैयामी महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे.









