घूमर चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्री सैयामी खेर आता स्वत:ची आगामी सीरिज ‘स्पेशल ऑप्स’च्या तिसऱ्या सीझनसाठी सक्रीय झाली आहे. निर्माता-दिग्दर्शक नीरज पांडेची वेबसीरिज ‘स्पेशल ऑप्स’च्या तिसऱ्या सीझनचे चित्रिकरण सुरू झाले आहे. या सीरिजमध्ये सैयामी एक दमदार भूमिका साकारताना दिसून येणार आहे. या सीरिजवरून सैयामी अत्यंत उत्साही आहे.
स्पेशल ऑप्समध्ये सैयामीने रॉ चे सदस्य के.के. मेनन यांच्या टीममधील जूही कश्यप ही व्यक्तिरेखा साकारली होती. या सीरिजच्या दुसऱ्या सीजनमध्ये सीरिजच्या प्रीक्वेलची कहाणी होती, यात सैयामी दिसून आली नव्हती. परंतु आता ती स्पेशल ऑप्सच्या तिसऱ्या सीजनमध्ये परतणार आहे.
सैयामीच्या ‘घूमर’ चित्रपटाला मोठी पसंती मिळाली होती. या चित्रपटात तिने दिव्यांग क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सैयामी आता स्पेशल ऑप्स सीझन 3 मध्ये पुन्हा एकदा नीरज पांडेसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.
स्पेशल ऑप्स ही सीरिज हेरगिरीवर आधारित आहे. याच्या पहिल्या दोन सीझन्सना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. स्पेशल ऑप्स सीझन 3 चे चित्रिकरण देशविदेशात सुरू झाले आहे. मुंबई, दिल्ली आणि देशातील अन्य हिस्स्यांसोबत विविध देशांमध्ये याचे चित्रिकरण पार पडणार आहे.









