राष्ट्रीय पातळीसाठी राज्य पातळीवर झालेली निवड
राय : एबी प्रोडक्शनतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या मिस गोवा सौदर्य स्पर्धेत राय गावातील साईशा प्रभू या 22 वर्षीय युवतीची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील सौदर्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एबी प्रोडक्शन ही राज्य पातळीवर संभाव्य उमेदवारांची निवड करीत असते. जानेवारी व फेब्रुवारी 2023 महिन्यात या संस्थेने राष्ट्रीय पातळीसाठी निवड करण्यासाठी गोवा राज्यात स्थानिक पातळीवर आयोजीत करण्यात आलेल्या स्पर्धेत साईशा प्रभू हिची निवड करण्यात आली आहे. बेळगावच्या एका महाविद्यालयात आर्कीटेक्चर पदवीचा अभ्यास करीत असलेल्या साईशा प्रभू हिने आपल्या या प्राथमीक यशाबद्दल एबी प्रोडक्शनचे आभार मानले आहेत. राय येथील नारायण प्रभू व निलीमा प्रभू यांची मुलगी असलेली साईशा प्रभू हिची ती वाटचाल करीत असलेल्या अभ्यासक्रमाबरोबरच तिला डिझायनींग क्षेत्रातही बरीच आवड आहे. एबी प्रोडक्शनने मिस गोवा 2023 च्या निवडीसाठी गोव्यातील अनेक शहरात चाचण्या घेतल्या होत्या. 2019 पासून एबी प्रोडक्शनची निर्मीती झाली असून तेव्हापासून ही संस्था सातत्याने अशा प्रकारची प्राथमीक पातळीवर निवड करण्यासाठी सौदर्य स्पर्धा आयोजीत करीत असते. अब्रार नाईक व अनोख भट या संस्थेचे संचालक आहेत.









