सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक टी ट्वेंटी लीग क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत साईराज वॉरियर्स इंडियन बॉइज हिंडलगा संघाचा व रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने पोद्दार रॉयल्स सीसीआय संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. रब्बानी दफेदार (साईराज) राहुल नाईक (बीएससी) याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिला सामन्यात साईराज वॉरिअर संघाने इंडियन बॉइज हिंडलगा संघाचा 29 धावांनी पराभव करत आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली. साईराज वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व बाद 147 धावा केल्या. त्यात कर्णधार ओमकार वेर्णेकर 4 चौकार व 2 षटकारांसह व केदारनाथ उसुलकर 2 षटकार एक चौकारांसह प्रत्यकी 33, नंदकुमार मलतवाडकरने 18, सुधन्वा कुलकर्णीने 17 धावा केल्या. इंडियन बॉइज हिंडलगा तर्फे सुधीर गवळी व सुमित करगावकर यांनी प्रत्येकी 3 तर सुशांत कोवाडकरने 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज संघाचा डाव 19.4 षटकात 118 धावात आटोपला. त्यात कावीश मुक्कण्णावरने 6 चौकार व एक षटकारांसह 39, शिवम नेसरीकरने 23 धावा केल्या. साईराज तर्फे रब्बानी दफेदारने 18 धावांत 4, संतोष सुळगे-पाटीलने 14 धावांत 3, सुधन्वा कुलकर्णीने 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने पोतदार रॉयल्स सीसीआय संघाचा केवळ 6 धावांनी पराभव केला. रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडीबाद 144 धावा केल्या. त्यात कर्णधार राहुल नाईकने 4 चौकार व 4 षटकारांसह 53, सिद्धेश असलकरने 2 चौकारांसह नाबाद 41 धावा केल्या. पोतदार तर्फे स्वंयम आप्पण्णवर 30 धावांत 3, आदर्श हिरेमठ व अंगदराज हितलमणी यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पोतदार रॉयल्स संघाने 20 षटकात 7 गडीबाद 138 धावा केल्या. त्यात आदर्श हिरेमठने सर्वाधिक 43, रविचंद्र उकळीने 29, अंगदराज हितलमनीने 21 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स संघातर्फे सौरव सामंत 30 धावांत 3 गडी तर अक्षय पाटील व यश हावळळाण्णाचे व आकाश कटांबळे यांनी प्रत्येकी एक गडीबाद केला. पहिला सामन्यात प्रमुख पाहुणे आर. बी. चौगुले शिरीष कराडे व सुधाकर पाटणकर यांच्या हस्ते सामनावीर रब्बानी दफेदार व इम्पॅक्ट खेळाडू ओमकार वेर्णेकर यांना चषक प्रदान करण्यात आला.प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत पाटील शिवाजी हिरेकुडी व सागर हवळानाचे यांच्या हस्ते सामनावीर राहुल नाईक व इम्पॅक्ट खेळाडू सौरव सामंतना चषक देण्यात आला.









