वृत्तसंस्था/ अॅस्टेना
भारताचा वेटलिफ्टर साईराज परदेशीने येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ पुरूष आणि महिलांच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत मंगळवारी कास्यपदक मिळविले. अलिकडेच झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत परदेशीने 81 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले होते.
पुरूषांच्या 86 किलो वजन गटात साईराज परदेशीने स्नॅचमध्ये 152 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 186 किलो असे एकूण 338 किलो वजन उचलत कास्यपदक पटकाविले. 2024 च्या डोहा येथे झालेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत महाराष्ट्रातील मनमाड येथे राहणाऱ्या साईराज परदेशीने सुवर्णपदक पटकाविले होते. 2024 साली झालेल्या राष्ट्रकूल युवा कनिष्ठ व वरिष्ठांच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत साईराजने सुवर्णपदक मिळविले होते. औरंगाबादच्या साई केंद्रामध्ये साईराज सराव करीत आहे.









