परराज्यातील 16 आणि स्थानिक 16 संघांचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला मंगळवार दि. 25 पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून परराज्यातून येणारे संघ दाखल झाले आहेत.
सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर अखिल भारतीय निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेला मंगळवारी सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा पुरस्कर्ते महेश फगरे, रोहित फगरे, राहुल फगरे, जॅकी मस्करेन्स, हर्ष जॉन थॉमस, अमर सरदेसाई, दीपक गोजगेकर, विजय धामणेकर, चंदन कुंदरनाड, अमर नाईक, अभिषेक शेट्टी, दयानंद माळी, झेवियर गोम्स, शीतल वेसणे, महांतेश गाणगेर, गजानन फगरे, आनंद आकनोजी, पवन कांबळे, सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बाहेरील राज्यातील ग्लोबल एफसी केरळ, रियल चिकमंगळूर, इनिपोया मंगळूर, मराठा स्पोर्ट्स मुंबई, पीटीएम कोल्हापूर, डायमंड एफसी मिरज, फाल्क नुमा हैदराबाद, युनायटेड एफसी केरळ, बीटा एफसी पुणे, बार्बोसा एफसी गोवा, अलफतेह मुंबई, दिलबहार कोल्हापूर, फिनिक्स एफसी हुबळी, सांगली एफसी., एसआरएस हिंदुस्थान गोवा एफसी या बाहेरील संघानी भाग घेतला आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सामना बुफा इलाईट वि. किंग्स युनायटेड यांच्यात सकाळी 8 वा., दुसरा सामना बेळगाव एफसी वि. स्वस्तिक इलेव्हन सकाळी 9 वा., तिसरा सामना साईराज एफसी वि. एमएसडीएफ एफसी सकाळी 10 वा., चौथा सामना बुफा ‘ब’ वि. फास्ट फॉरवर्ड एफसी सकाळी 11 वा., पाचवा सामना पहिल्या सामन्यातील विजेता वि. दुसऱया सामन्यातील विजेता दुपारी 1 वा. तर सहावा सामना तिसऱया सामन्यातील विजेता वि. चौथ्या सामन्यातील विजेता यांच्यात दु. 2 वा. होणार आहे.









