बेळगाव : के रत्नाकर शेट्टी स्पोर्टस फौंडेशन आयोजित राहुल के. आर. शेट्टी चषक निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून साईराजने फॉन्कोचा, कॉसमॅक्स मजर युनायटेडचा, बुफाने निपाणी युनाटेडचा तर फास्ट फॉरवर्डने आयाबीसीटीचा पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. प्रज्ञुम, हयान शेख, अमिन, तेजस इंचल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. लव्हडेल स्कूलच्या स्पोटिंग पॅल्हनेट मैदानावरती खेळविलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साईराजने फॉन्को क्लबचा 6-1 असा पराभव केला. या सामन्यात 13 प्रज्वल लाडच्या पासवर सौरभ धामणेकरने पहिला गोल केला. 15 व्या मिनिटाला सौरभच्या पासवर प्रज्वल लाडने दुसरा गोल केला. 20 व 31 व्रा मिनिटाला श्रेयशच्या पासवर निखिल सलग दोन गोल करुन 4-0 आघाडी साईराजने पहिल्या सत्रात मिळविली. दुसऱ्या सत्रात 39 व्या मिनिटाला निखिलच्या पासवर श्रेयशने पाचवा गोल केला. 62 व्या मिनिटाला प्रज्वलच्या पासवर मंथनके सहावा गोल करून 6-0 अशी आघाडी मिळवून दिली. 65 व्या मिनिटाला फँन्कोच्या समर्थने गोल करून 1-6 अशी आघाडी कमी केली.
दुसऱ्या सामन्यात कॉसमॅक्सने मझर युनायटेडचा टापब्रेकर मध्ये 4-3 असा पराभव केला. या सामन्यात दोन्ही स्ंाघानी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण यश आले नाही. दुसऱ्या सत्रात पुन्हा गोल करण्यासाठी जोरदार चढाया केल्या पण या सत्रात गोल करण्यात अपयश आल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यात कॉसमॅक्सने 4-3 असा पराभव केला. कौसमॅक्स तर्फे सोयब, ओरम, मोनीसन, अमिन यांनी गोल केले. तर मझर युनायटेड तर्फे अबुझर बिस्ती, अमिर, झुलीन यांनी गोल केले. तिसऱ्या सामन्यात बूफा एफसीने निपाणी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात बुफाच्या नझिब इनामदारने गोल करण्याची सोपी संधी वाया घालविली. 22 व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेने मारलेला फटका गोल पोष्टला लागुन बाहेर गेला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आल्याने गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 40 व्या मिनिटाला विनायकने मारलेला फटका बुफाच्या गोलरक्षक ओमने उत्कृष्ट अडविला. खेळ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना बुफाच्या नझिब इनामदारच्या पासवर हयान शेखने गोल करून 1-0 ची आघाडी बुफाने मिळवून दिली. त्यानंतर निपाणीने गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याना अपयश आले.
चौथ्या सामन्यात फास्ट फॉरवडने आयबीसिटीचा 2-1 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 4 व्या मिनिटाला फास्ट फॉरवडच्या इदायतच्या पासवर प्रज्ञुमने पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 15 व्या मिनिटाला फास्ट फॉरवडच्या साहिदच्या पासवर नदिमने दुसरा गोल करून 2-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 40 व्या मिनिटाला आयबीसिटीच्या कौसिक पाटीलने गोल करण्याची सुवर्ण संधी वाया घालविली. 50 व्या मिनिटाला आयबीसिटीच्या किरण चव्हाणच्या पासवर प्रनित चिगरेने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अॅड. विणय पाटील, राहुल फगरे, सलिम फनिबंद, प्रसन्ना शेट्टी, पुनित शेट्टी, प्रशांत लायंदर, वसिम धामणेकर, सचिन फुटाणे, तेजस शहा व आयोजक प्रणय शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर प्रद्युम्न, आरोहण, अमिण, तेजस इंचल यांना तर इम्पॅक्ट खेळाडू विनय, अक्षय पोटे, नवीन किणगी यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
शनिवारचे उपांत्य फेरीचे सामने
1) फास्ट फॉरवर्ड वि. कॉसमॅक्स, सायं. 5 वा. 2) बुफा वि. साईराज, सायं. 7 वा.









