बेळगाव : केएलएस आयएमईआर महाविद्यालय आयोजित आयएमईआर चषक निमंत्रितांच्या बुद्धिबळ स्पर्धेत शिमोग्याच्या विशाल आंद्रादेने प्रथम, गदगच्या नंदकुमार सोलकेरीने दुसरा तर बेळगावच्या साई मंगनायकने तिसरा व खुल्या गटात कोल्हापूरचा साईराज भोसले प्रथम, अभिषेक गाणगेर दुसरा, गौरव जाजु तिसरा क्रमांक पटकाविला. आयएमईआरच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या आंतरराज्य बुद्धिबळ स्पर्धेत विविध राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये शिमोग्याच्या विशाल आंद्रादेने प्रथम, गदगच्या नंदकुमार सोलकेरी दुसरा, बेळगावच्या साई मंगनायकने तिसरा, बेळगावच्या सिद्धार्थ ताबाजने चौथा, अनिरुद्ध दासारीने पाचवा क्रमांक पटकाविला.
तर खुल्या गटात कोल्हापूरच्या साईराज भोसलेने प्रथम, बेळगावच्या अभिषेक गाणगेरने दुसरा, बेळगावच्या गौरव गोपाल जाजुने तिसरा, रासी अहम्मद खानने चौथा तर शिमोग्याचा विल्सन अद्रादेने पाचवा क्रमांक पटकविला. सदर स्पर्धेत 136 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये दोन मलेशियन खेळाडूही सहभाग झाले होते. आयएमईआरचे चेअरमन आर. एस. मुतालिक, महाविद्यालयाचे डॉ. आरीफ शेख, क्रीडा प्राध्यापक डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज, प्रमुख पंच गिरीश बाचीकर, आकाश माडीवलर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे, 5000, 2500, 2000, 1500, 1000 अशी रोख रक्कम, पारितोषक देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साक्षी शहा, ऐश्वर्या कोळेकर, अभिषेक शेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.









