वृत्तसंस्था / कराची
पाकचा सलामीच फलंदाज नवोदित सईम आयुब याला दुखापत झाल्याने तो आगामी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी घोषणा पीसीबीने शुक्रवारी केली आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात पाकचा क्रिकेट संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात खेळताना सईम आयुबच्या घोट्याला दुखापत झाली होती. ही दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी किमान 10 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. सईमवर सध्या वैद्यकीय उपचार चालु आहेत. 19 फेब्रवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला सईम आयुबला मुकावे लागणार आहे. पाकचा क्रिकेट संघ येत्या मार्च, एप्रिल दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिका 16 मार्च ते 5 एप्dिरल दरम्यान होणार आहेत. या दौऱ्यानंतर 5 सुपरलीग स्पर्धेला 8 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे.









