रामायणावर तयार होतोय नवा चित्रपट
दिग्दर्शक नितेश तिवारी हे लवकरच रामायणावर आधारित चित्रपट निर्माण करणार आहेत. या चित्रपटात तिवारी यांनी सीतामातेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री सई पल्लवीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन तिवारी यांच्यासोबत रवि उद्यावर करणार आहेत. तर भगवान रामाच्या भूमिकेत रणवीर कपूर दिसून येणार असल्याचे मानले जात आहे. सीतामातेच्या भूमिकेसाठी सई पल्ल्वीची लुक टेस्ट नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यापूर्वी दीपिका पदूकोन आणि आलिया भट्टचा या भूमिकेसाठी विचार करण्यात आला होता, परंतु दिग्दर्शकाने आता सईची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीतामातेच्या भूमिकेसाठी सई पल्लवी हीच दिग्दर्शकाची पहिली पसंती आहे. सईने 2005 मध्ये कस्तूरी मान या तमिळ चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित आदिपुरुष या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाल्याने निर्माते नव्या चित्रपटाबद्दल मोठी खबरदारी बाळगत आहेत. रामायणावर आधारित पाहण्याजोगा चित्रपट निर्माण करू, चित्रपटातील कलाकारांसंबंधी लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे नितेश तिवारी यांनी म्हटले आहे.









