बेळगाव प्रिमियर लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
अर्जुन स्पोर्ट्स क्लब आयोजित बेळगाव प्रिमियर लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात तनय स्पोर्टींगने एवायएम अनगोळचा पाच गड्यांनी, एवायसीने साक्षी एंटरप्राईजेसचा 21 धावांनी, साई इंडियन बॉईज संघाने सरकार स्पोर्ट्स गांधीनगरचा पाच गड्यांनी तर सिग्नेचर संघाने शिवनेरी लायन्स संघाचा 23 धावांनी पराभव प्रत्येकी दोन गुण मिळविले. साकिब लंगोटी, तनीष्क नाईक, मनोज पाटील, विनोद तावले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
एसकेईच्या प्लॅटिनम ज्युबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात तनय स्पोर्टींगने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 2 गडी बाद 79 धावा केल्या. त्यात साकिब लंगोटीने 2 षटकार, 2 चौकारासह 30, अंजारने 3 चौकारासह 22 धावा केल्या. एवायएम अनगोळतर्फे जुनेद ताशीलदार व आकाश असलकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एवायएम अनगोळने 10 षटकात 5 गडी बाद 74 धावा केल्या. त्यात मुझफरने 4 चौकारासह 30 धावा केल्या. तनयतर्फे साकिब लंगोटीने 7 धावात 3, विशाल हंडे व किरण पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दुसऱ्या सामन्यात एवायसी संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 6 गडी बाद 78 धावा केल्या. त्यात रुन मचिनने 2 षटकार, 3 चौकारांसह 31, चेतन पांगिरेने 2 चौकारांसह 18, तर विनोद तावलेने 10 धावा केल्या. साक्षी एंटरप्रायजेसतर्फे आकाश कटांबळे 19 धावात 2, सागर जी. ने 22 धावात 2 तर सुशांत कोवाडकर व अमोल यल्लुपाचे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साक्षी एंटरप्राईजेस संघाचा डाव 8.4 षटकात 57 धावात आटोपला. त्यात आकाश कटांबळेने एकाकी लढत 2 चौकारांसह 25 धावा केल्या. एवायसीतर्फे विनोद तावले व साफिक यांनी प्रत्येकी 15 धावात प्रत्येकी 4 गडी बाद केले. तर प्रतिक बाळेकुंद्रीने 14 धावात 2 गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात सरकार स्पोर्ट्स गांधीनगरने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 9 बाद 63 धावा केल्या. त्यात विनायक शाहू 19, नवीनने 11 धावा केल्या. साई इंडियन बॉईजतर्फे तनिष्क 8 धावात 3, पवन शिंदे 10 धावात 3, सुधीर गवळी, विशाल दळवी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल साई इंडियन बॉईजने 7 षटकात 5 बाद 64 धावा केल्या. त्यात तनीश्क नाईकने 1 षटकार, 4 चौकारासह 37, विनय चोपडेने 9 धावा केल्या. गांधीनगरतर्फे पुंडलिक पाटीलने 12 धावात 2 तर रवी पिल्ले व कैफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

चौथ्या सामन्यात सिग्नेचर संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 षटकात 4 गडी बाद 60 धावा केल्या. त्यात मनोज पाटीलने 1 षटकार, 1 चौकारासह 25, प्रवीण काळेने 2 चौकारांसह 14 तर मनोज ताशिलदारने 2 चौकारांसह 13 धावा केल्या. शिवनेरी लायन्सतर्फे शंकर व नामदेव गुरव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवनेरी लायन्सने 7 षटकात 7 गडी बाद 37 धावाच केल्या. त्यात मारुती बी. ने 2 चौकारांसह 13 तर राजूने 10 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे भरत गाडेकर 3 धावात 2, प्रशांतने 10 धावात 2 तर मनोज ताशिलदार व शिराले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आशिष चव्हाण, राजशेखर सिद्दलिंग, नागेश चव्हाण, चेतन चौगुले, उमेश गोपाल, जोतिबा बिर्जे, गणेश मुतगेकर, डॉ. संतोष पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सामनावीर शेख लंगोटी, मनोज पाटील, विनोद तावले, तनीश्क नाईक तर इम्पॅक्ट खेळाडू मुजफ्फर, प्रवीण शिंदे, सादीक एम. व भरत गाडेकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
रविवारचे सामने
मोहन मोरे वि. एवायसी सकाळी 9.30 वाजता, सरकार गांधीनगर वि. तनय स्पोर्टींग सकाळी 11.30 वाजता, सिग्नेचर वि. साक्षी एंटरप्रायजेस दुपारी 1.30 वाजता, शिवनेरी लायन्स वि. मोहन मोरे दुपारी 3.30 वाजता









