बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिर्डींग संघटना व मेणसे फिटनेस यांच्यासंयुक्त विद्यमाने मेणसे फिटनेस टॉपटेन जीम मर्यादीत शरीरसौष्ठव स्पर्धेत साहील पाटीलने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर विजेतेपद पटकाविले. येळ्ळूर येथे झालेल्या मेणसे फिटनेस टॉपटेन स्पर्धेत साहील पाटीलने प्रथम, कल्पेश कुंडेकरने द्वितीय, आकाश जोगनने तिसरा, चेतन पेटणेकरने चौथा, हेमंत पाटीलने पाचवा, किशोर बिजगरकरने सहावा, ओमकार हेळवेने सातवा, प्रथमेश पुंद्रेने आठवा, अनिकेत पाटीलने नववा तर रोहीत अविचारीने दहावा क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, अरविंद पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, शशिकांत धुळजी, जोतिबा चौगुले, विलास बेडरे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक, प्रमाणपत्र, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दन्नावर, प्रकाश पुजेरी, बंडू मजुकर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, सुनील राऊत, बसवराज अरळीमट्टी, आकाश हुलीयार, सुनिल पवार, आनंद लंगरकांडे व नूर मुल्ला यांनी काम पाहिले.
Previous Articleलोकमान्य केसरीसाठी येळ्ळूरात आज कुस्ती मैदान
Next Article महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराधला विजयी म्हणून घोषित
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









