वृत्तसंस्था/ टॅम्पिको, मेक्सिको
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए 125 अबीर्टो टॅम्पिको महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्लीने माजी यूएस ओपन चॅम्पियन स्लोअन स्टिफेन्सला पराभवाचा धक्का देत तिचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले.
24 वर्षीय सहजा जागतिक क्रमवारीत 347 व्या स्थानावर आहे तिने माजी जागतिक तृतीय मानांकित स्टीफेन्सला 6-2, 6-2 असा धक्का देत खळबळ माजवली. दुसऱ्या फेरीत तिची लढत दुसऱ्या मानांकित पेत्र मार्सिन्कोशी होईल.









