वनसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
खानापूर : नागरगाळी वनक्षेत्रातील श्रीकृष्णनगर गवळीवाडा येथे सागवान लाकूड साठा जप्त करून ठेवल्याची माहिती नागरगाळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. याबाबत बेळगाव जिल्हा वनसंरक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्र तयार करून कृष्णनगर-गवळीवाडा येथे काही घरावर छापा टाकण्यात आला. यात गंगाराम दत्तू बोडके यांच्या घरातून सुमारे 3000 घनफूट सागवान लाकूड जप्त करण्यात आले. तसेच भिजवलेले मास जप्त करण्यात आले असून त्याच्यावर वनसंरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर बाबू वारका यांच्या घरीही सागवान लाकूड सापडले असून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरगाळी वनसंरक्षण अधिकारी पुढील तपास करत आहेत. यावेळी मुख्य संरक्षणाधिकारी मंजुनाथ चव्हाण, उपअरण्य संरक्षणाधिकारी एस. के. कल्लोळकर, नागरगाळी उपविभागाचे साहाय्यक अरण्य संरक्षणाधिकारी एम. बी. कुसनाळ, नागरगाळी वन अधिकारी रत्नाकर वब्बन्नावर यांचा या कारवाईत सहभाग होता.









