धिरीजा मोरेने पटकावले 7 सुवर्ण व 1 रौप्य, संस्कार कोपार्डेकरनेची 2 सुवर्ण पदकांना गवसणी
कोल्हापूर
कोल्हापुरातील सागर पाटील स्विमिंग क्लबच्या जलतरणपटूंनी तर अफलातून कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावून स्पर्धेवर वर्चस्व मिळवले.
स्विमिंग हब फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील आजच्या पहिल्या दिवशी 70 जलतरण प्रकारांमध्ये विविध जलतरणपटूंनी 180 जलतरणपटूंनी प्रतिनिधीत्व केले. आपआपल्या गटात उत्तम कामगिरी करत पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवलेल्या जलतरणपटूंना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, तुकाराम माळी तालीमचे सचिव संदीप पाटील, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, माजी फुटबॉलपटू धोंडीराम कांबळे, उद्योजक सिद्धेश व सायली घोरपडे, मराठा महासंघाचे जिल्हा युवासचिव अवधूत पाटील, डॉ. सुरेश वणकुद्रे आदींच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरवण्यात आले.
राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल असा
400 मीटर फ्रीस्टाइल: संस्कार कोपर्डेकर (सागर पाटील स्विमिंग क्लब)-सुवर्ण, सोहम मंजुळी (एक्वाटेक्निक स्विमिंग अॅकॅडमी-पाटण)-रौप्य, गौरव जाजू (सिंधुदुर्ग)-कांस्य.
राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल असा
400 मीटर फ्रीस्टाइल: आर्यन पाटील (खेलो इंडिया सेंटर-गोवा)-सुवर्ण, तन्मय साळुंखे (हॅलो इंडिया गोवा)-रौप्य, संस्कार कोपार्डेकर (सागर पाटील स्विमिंग क्लब)-कांस्य.
50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक: तेजस्विनी कुंभार (सागर पाटील स्विमिंग क्लब)-सुवर्ण, एलिना अयंगार (श्रीवास्तव फॉरेस्ट क्लब)-रौप्य, आदिती अश्विनकुमार माळी)- (व्ही. एन. अॅकॅडमी)-कांस्य.
100 मीटर बॅकस्ट्रोक: धिरीजा रमेश मोरे (सागर पाटील स्विमिंग क्लब)-सुवर्ण,
भक्ती रोहीत जाधव (तासगाव-जलतरण संस्था मिरज)-रौप्य
200 मीटर आयआय: श्रीधर योगेश कमते (सागर पाटील स्विमिंग क्लब)-सुवर्ण, अथर्व जयेंद्र जोशी (व्ही. एन. अॅकॅडमी)-रौप्य, शिवतेज निलेश रत्नपारखी (पुणे)-कांस्य.

धीरजाची उत्तुंग कामगिरी…
राज्य व राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेल्या कोल्हापूरच्या धिरीजा रमेश मोरेने उत्तुंग कामगिरी करत तब्बल 7 सुवर्ण व 1 रौप्य पदकाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला. ती 19 वर्षाखालील मुलींच्या गटातून स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने राज्य व राष्ट्रीय 400 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात प्रत्येकी 1 सुवर्ण तर राज्य व राष्ट्रीय 100 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारातही प्रत्येकी सुवर्ण पदक जिंकले. तसेच राज्यस्तरीय 200 मीटर आयएम प्रकारात 1 सुवर्ण व राष्ट्रीय 200 मीटर आयएम प्रकारात 1 रौप्य पटकावतानाच राज्य व राष्ट्रीय 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात प्रत्येकी सुवर्ण पदक पटकावले. धिरीजाही सागर पाटील स्विमिंग क्लबची जलतरणपटू आहे.








