न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग एस . टी महामंडळाचे विभाग नियंत्रक असंवेदनशील बनलेत . दोडामार्ग वीजघर मार्गावरील दोन एसटी बस रस्ता सोडून बाजूला कलंडल्या आणि गंभीर अपघात झाला. त्यातील बेळगाव गाडी तर भरधाव वेगातच रस्ता सोडून बाहेर गेली. प्रवाशांनी चालक केबिन मधून बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला . तर विजघऱ गाडी मागच्या बाजूने गटारात गेली. सदर अपघातात सात जण जखमी झाले. त्यातील काही जणांवर साटेली आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत तर काही जणांना गोवा- बांबुळी येथे अधिक उपचारकरिता नेण्यात आले. मात्र एवढा मोठा गंभीर अपघात झालेला असतानाही सावंतवाडी आगारातील आगार व्यवस्थापक सारखे निर्णयक्षम पद रिक्त असतानाही विभागीय कार्यालयाच्या एकाही अधिकाऱ्याने अपघात स्थळी भेट दिलेली नाही. एवढा मोठा अपघात होऊनही विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची अपघात स्थळी अथवा जखमी व्यक्तींची भेट घेण्याची मानसिकता दिसून आली नाही. एस टी महामंडळाच्या नियमानुसार अशा गंभीर अथवा अपघात स्थळी विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकारी यांनी भेट देणे आवश्यक होते.
मात्र एवढा मोठा अपघात घडलेला असतानाही या अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने त्यांची असंवेदनशीलता दिसून येत आहे. तरी ,अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी होऊन कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. तसेच अशा अधिकाऱ्यांमुळेच एसटीची प्रतिमा लोकांत मलीन होत आहे. सद्या बऱ्याच एसटी गाडयांचे आयुष्य तसेच किलोमीटर पूर्ण झालेल्या मोडक्या,टेल लाईट चालू नसलेल्या, पत्रे उचललेल्या गळक्या गाड्या प्रवासी वाहतूकीकारिता वापरल्या जात आहेत. त्यामुळे सद्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. असे असताना RTO कार्यालयाकडून अशा गाड्या पासिंग होतातच कशा अशा गाडयांना फिटनेस सर्टिफिकेट आर . टी . ओ कडून कसे काय दिले जाते असा प्रश्नही लोकांकडून विचारला जात आहे. तरी RTO अधिकाऱ्यांकडून अशा गाड्यांची वाटेत तपासणी करून कारवाई केली जावी जेणेकरून अशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे बंद होईल. आणि अपघातही रोखता येतील. तसेच ज्या गाड्यांचा आता अपघात झाला आहे अशा गाड्यां प्रवाशी वाहतूकीकारिता योग्य होत्या का? याचीही तपासणी आर. टी .ओ कडून करण्यात यावी.
सद्या शालेय फेऱ्या वेळेत जात नसल्याने लोकप्रतिनिधी तसेच शाळांकडून गाड्या वेळेत सोडण्याबाबत वारंवार विभाग नियंत्रकांना निवेदने दिली जात आहेत. मात्र या अधिकाऱ्यांकडून गाड्या वेळेतसोडण्याची फक्त आश्वासने दिली जातात. मात्र , कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे मुलांचे नाहक नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष केले जात आहे,. सध्याच्या विभाग नियंत्रकांचे आगारांच्या कामगिरीवर कोणतेही नियंत्रण नाही. शालेय फेऱ्या वेळेत सोडून मुलांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोणतीही उपाय योजना यांच्याकडून अद्यापही केली जात नाही. शासनाकडून मुलांना सवलती देऊन शैक्षणिक पास दिले जातात. मात्र, गाड्या वेळेत नसल्याने त्यांना उशिरा शाळेत जावे लागते आणि शैक्षणिक नुकसान होते यावरूनच या अधिकाऱ्यांची मुलांच्या शिक्षणापप्रति असलेली असंवेदशीलात दिसून येत आहे.आज सिंधुदुर्ग विभाग तोट्यात असल्याने वरिष्ठाकडून वारंवार विचारणा होत आहे. मात्र, अशा अनेक कारणानेच एसटीचा तोटा वाढत चालला आहे.याला कारणच हे असे असंवेदनशील आणि मुजोर अधिकारी आहेत. तरी अशा अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांप्रती तसेच मुलांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या असंवेदनशील अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे.असे मत सागर नाणोसकर यांनी व्यक्त केले .









