वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)
आयएसएसएफ विश्व रायफल-पिस्तुल नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरुषांच्या कनि÷ गटात 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताचा नेमबाज सागर डांगेने सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात दोन पदकांची कमाई केली.
या स्पर्धेतील शुक्रवारचा दिवस भारताला संमिश्र ठरला. शुक्रवारी स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताने एक सुवर्णासह चार पदकांची कमाई केली. पदकतक्त्यात भारत दुसऱया स्थानावर असून त्यांनी 11 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह एकूण 30 पदके मिळविली आहेत. चीनने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.
महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये भारताच्या अंजुम मोदगिलला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत तिची पहिल्या फेरीतील कामगिरी बऱयापैकी झाली होती. मात्र, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या कोटा पद्धतीतून तिला स्थान मिळू शकले नाही. कनि÷ पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत सागर डांगीने रौप्यपदक तर वरुण तोमरने कांस्यपदक मिळविले. 10 मीटर एअर रायफल कनि÷ांच्या मिश्र सांघिक प्रकारात नॅन्सी, श्रीकार्तिक रविशंकर आणि डांगी कांस्यपदक पटकाविले. पुरुषांच्या कनि÷ विभागात 10 मी. एअर पिस्तुल सांघिक प्रकारात वरुण तोमर आणि सम्राट राणा यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजी वैयक्तिक प्रकारात सागर डांगीने रौप्यपदक घेतले. सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत चीनच्या जिनकेंगने डांगीचा 16-12 असा पराभव केला. महिलांच्या 3-पी प्रकारात चीनच्या वेनरूने सुवर्णपदक पटकाविले.









