Saffron Project : टाटा एअरबसनंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. मिहानमधील एक प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती समोर आली आहे. फ्रान्सच्या सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.विमान तसंच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी हैदराबादला गेली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ११८५ कोटींची प्राथमिक गुंतवणूक येणार होती. तसेच राज्यात ५०० ते ६०० कुशल रोजगार निर्मिती होणार होती. मात्र हा पकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे झोड उठवले आहेत.दरम्यान राष्ट्रवादीच्य़ा खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे- फडणवीस सरकावर निशाणा साधला आहे.
नवे उद्योग राज्याबाहेर का जात आहेत
टाटा एअरबसनंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राजकिय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.यासंदर्भात राष्ट्रवादीच्य़ा खासदार सुप्रिया सुळे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रकल्प बाहेर जात असल्याचे दु:ख वाटतयं.केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र काम करायला पाहिजे. सध्याच्या मंत्र्यांचे दावे हास्यास्पद आहेत. एकनाथ शिंदे आधीच्या मंत्रिमंडळात देखील होते.त्यावेळी का आरोप केले नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी केला. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असेही त्या म्हणाल्या.
उद्योगमंत्र्यांनी गुंतवणुकीचा केलेल्या दाव्यात तथ्य नाही. सगळे प्रकल्प आधी आले आहेत. त्या प्रकल्पाला आधीच मंजूरी मिळाली होती.सिनारमास प्रकल्पाची गुंतवणूक तीन महिन्यात झाली नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या राज्यात प्रकल्प गेला याचं दु:ख नाही. कारण भारताचा तो एक भाग आहे. पण मेरीटनुसार विचार केला तर मेरीटवर पास होवूनही महाराष्ट्रातले प्रकल्प काढून का घेतले जातात याचे उत्तर मुख्य़मंत्र्यांनी द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुढच्यावेळी यापेक्षा मोठा हे लाॅलीपाॅप दिले जात आहे,असा आरोपही त्यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








