जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा उत्साहात
बेळगाव : युवजन सेवा क्रीडा खाते, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायततर्फे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये साधना क्रीडा संघाने जिंकली. जिल्हा क्रीडांगण येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिला सामना कित्तूर संघाबरोबर झाला. साधना क्रीडा संघांने हा सामना 10 गुण व एक डावाने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतच्या सामन्यात साधना संघाने हुक्केरी संघाचा 10 गुण व एक डावाने पराभव केला. अंतिम सामन्यात सौंदत्ती संघाचे पहिला डावामध्ये 10 गडी बाद केले होते. सौंदत्ती संघाने साधना संघाचे 2 गडी बाद केले. साधना संघाने फॉलोआन दिल्याने परत सौंदत्ती संघाने साधना संघाचे तीन गडी बाद केले अशाप्रकारे पाच गडी व एक डावाने साधना संघाने हा सामना एकतर्फे जिंकला. या संघामध्ये आदित्य पाटील, आकाश, गणेश कोवाडकर, महेश, नागेश, या सर्वांनी शानदार कामगिरी केली.









