सनातन संस्थेच्या स्वाती खाड्यो यांचे मत
बेळगाव : हिंदू धर्माचे पालन न केल्याने समाज अधोगतीला गेला आहे. जीवनातील 80 टक्के समस्यांचे मूळ कारण आध्यात्मिक असते. या समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणजेच साधनाच आवश्यक असते. ही साधना कशी करावी, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, असे विचार सनातन संस्थेच्या स्वाती खाड्यो यांनी व्यक्त केले. नंदिहळ्ळी येथे सनातन संस्थेतर्फे आयोजित ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर त्या बोलत होत्या. स्वाती यांनी दु:खाची कारणे, साधनेचे विविध मार्ग, कलियुगातील योग्य साधना कोणती या विषयांवर मार्गदर्शन केले.









