दत्त वज्रकवच अनुष्ठान व संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन
पणजी : आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुऊ श्री दत्त पद्मनाभ पीठाचे क्रांतिकारी पीठाधीश्वर, पद्मश्री विभूषित, धर्मभूषण सद्गुऊ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचा जन्माष्टमी महोत्सव श्री क्षेत्र तपोभूमी गुऊपीठावर सोमवार दि. 27 रोजी संपन्न होणार आहे. समस्त गोमंतकीय या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. पू. सद्गुऊ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या जन्माष्टमीनिमित्ताने विविध जनकल्याणकारी कार्यक्रम सुसंपन्न केले जातात. यंदाच्या वर्षी सकाळच्या सत्रात श्रीदत्त वज्रकवच अनुष्ठान, श्री दत्त महायज्ञ, छप्पन्न भोग अर्पण, आरती, दर्शन, महापूर्णाहुती तसेच सायंकाळच्या सत्रात पूज्य सद्गुऊ राजोपचार महापूजा, गुऊगीता पठण, संगीत रजनी, दिव्य ज्योतिराराधना, पूज्य सद्गुऊ आशीर्वचन, मंत्र पुष्पांजली व दर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल. या महोत्सवाला विविध क्षेत्रातील महनीय मान्यवर उपस्थित असणार आहेत. सर्वांनी सहकुटुंब-सहपरिवार उपस्थित राहून या भव्य-दिव्य सोहळ्याचे साक्षीदार व्हावहृ असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे करण्यात आले आहे.









