आचरा प्रतिनिधी
आचरा वरचीवाडी येथील रहिवासी, इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानाचे माजी ट्रस्टी व देवस्थान मानकरी सदाशिव उर्फ बबन रामकृष्ण मिराशी (वय 75) यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले. आचरा देवस्थान ट्रस्टी म्हणून दीर्घकाळ कामकाज पाहिले. मनमिळाऊ, लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आचरा येथील महादेव मिराशी यांचे वडील व आचरा गावचे उपसरपंच संतोष मिराशी यांचे ते काका होत.









