वृत्तसंस्था/लीमा
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व चषक रायफल-पिस्तुल-शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक महिला नेमबाज श्रेयांका सदनगीकडून निराशा झाली. महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात तिला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या सॅगेन मॅडेलिनाने सुवर्णपदक पटकाविले. स्पर्धेच्या पदक तक्त्यात अमेरिका आता पहिल्या स्थानावर असून त्यांनी तीन सुवर्णांसह 6 पदके मिळविली आहेत. भारत दोन सुवर्ण तसेच एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे.









