म्हापसा : श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्ट कळंगूटच्या 59 जत्रोत्सवाला धुमधडाक्यात सुऊवात झाली आहे. केळ्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देव बाबरेश्वराच्या जत्रोत्सवाला राज्यातून आपला नवस फेडण्यासाठी केळीचा घड घेऊन भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सोमवारही भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी श्री देव बाबरेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी आमदार मायकल लोबो, देवस्थान अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर, गुऊदास शिरोडकर, महिला मंडळ अध्यक्ष माही सिमेपुऊषकर, पंच सदस्य प्रसाद शिरोडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आपला नवस फेडण्यासाठी भाविक बाबरेश्वराच्या जत्रोत्सवाला मोठ्या उत्साहाने येतात. आपण कळंगूट व राज्यातील भाविकांना शुभेच्छा देतो, देवाने सर्वांना सुख समृद्धी द्यावी, आरोग्य आयुष्य द्यावे. इतिहासात कळंगूट पोलिसांनी देव बाबरेश्वराला बंदुकाची सलामी दिली ही एक चांगली गोष्ट आहे. हा देव सर्वांची राखण करतो. येथे हजारो संख्येने भाविक येतात असे ते म्हणाले. .
पुढील वर्षी मंदिर बांधकाम पूर्णत्वास येईल : लोबो
दरम्यान बुधवारी मायकल लोबो यांनीही प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासमवेत देवाचे दर्शन घेतल्यानंतर म्हणाले, आपण वार्षिक येथे देवाचा आशीर्वाद घेण्यास येतो. हे मंदिर खास पाशाणी दगडाने बांधलेले आहे. पुढील वर्षी ते पूर्णत्वास येईल. दरम्यान सोमवार दि. 13 रोजी सकाळी यजमान श्री. व सौ. अनिता हर्षद कळंगुटकर (खोब्रावाडा कळंगूट) यांच्यातर्फे श्री सत्यनारायण महापूजा झाली. दुपारी महानैवेद्य झाला. सायं. 5 वा. श्री. शांतादुर्गा जांभळेश्वर बाल भजनी मंडळ कळंगूटतर्फे भजन सादर करण्यात आले. केळ्यांच्या घडांची पावणी झाल्यानंतर संचालिका जानवी बोंद्रे यांचा सांस्कृतिक नृत्यांचा कार्यक्रम झाला. तसेच मंगळवार दि. 14 रोजी सकाळी 10.30 वा. यजमान श्री. व सौ. स्वप्नाली सुनील वेंगुर्लेकर- प्रभुवाडा कळंगूटतर्फे श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. आरती, तीर्थप्रसाद व दुपारी यजमान व कुटुंबियांतर्फे महानैवेद्य होईल. सायं. 5 वा. सावतावाडा ग्रामस्थांतर्फे भजन, रात्री 8 वा. केळ्यांच्या घडांची पावणी, रात्री 9 वा. दोन अंकी धमाल विनोदी नाटक ‘शुभ टिंगल सावधान’ पुरस्कृत: समीर चोडणकर, समीर गोवेकर, मनोज नाईक, दिनेश सिमेपुरूषकर, किशोर दिवकर, विकी दिवकर, प्रविण नागवेकर, जीतेंद्र सिमेपुऊषकर.









