पणजी : गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी राज्यसभेत गोव्याचे खासदार म्हणून राजसभा सदस्यत्वाचे मराठीतून शपथग्रहण केले. मराठीतून शपथग्रहण करणारे ते गोव्याचे पहिले राज्यसभा सदस्य ठरले आहेत. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीला गेले होते. त्यांचा शपथविधी समारंभ सोमवारी झाला. राज्यसभेचे अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी त्यांना शपथ दिली. सायंकाळी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. न•ा तसेच पक्षाचे संघटनमंत्री व्ही. सतिश यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर तसेच माजी आमदार दामु नाईक उपस्थित होते.
Previous Articleकांपाल येथे तीन लाखाचा गांजा जप्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.