ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शरद पवारांनी मागची 50 वर्ष सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली, गावगाडा उद्धवस्त केला. तेच सरदार आता सैरभैर होऊन पळायला लागलेत. शरद पवार हे सैतान आहेत. त्यांच्यावर नियतीने सुड उगवला, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
खोत म्हणाले, 80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उदय झाला. तेव्हापासून राजकारणाच्या ऱ्हासाला सुरूवात झाली. इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. जवळपास 50 वर्ष शरद पवारांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं. तेच सरदार आज पवारांना सोडून जात आहेत. हा त्यांच्यावर नियतीने सूड उगवलेला आहे. त्यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे.
दरम्यान, आता महाराष्ट्रातील राजकारण प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे चालल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील या माणसांच मोठं योगदान आहे, असेही त्यांनी सांगितले.








