कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या सांगोल्यामधल्या आरोपानंतर राज्य सरकारकडून सुरक्षा दिली आहे. खोत यांच्याबरोबर शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना सरकारने सुरक्षा दिली आहे. सरकारने सुरक्षा तैनात केली आहे, पण आमचं संरक्षण आम्ही करू शकतो असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)म्हणाले. काल पत्रकार परिषदेत त्यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सदाभाऊ म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना दरोडेखोर आणि खंडणीखोरांची आहे.त्यांनी जरूर आंदोलन करावे पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अलीकडे आंदोलन कशावर करावे हे सुधारत नाही. आजी सांगत होती की गाढव टांग मारून हसायला लागत त्याची प्रचिती आज मला येत आहे असा टोलाही त्यांनी लगावला. हॉटेलचालक शिनगारे हे स्वाभिमानीचे कार्यकर्ते होते, असे राजू शेट्टी यांनी संबंधित हॉटेलवाल्याबद्दल माहिती दिली आहे. यावरुन सदाभाऊंनी राजू शेट्टी यांच्यावर निशाणा शाधला.
हेही वाचा- Kolhapur: चैनीसाठी दुचाकींची चोरी, ६ जण जेरबंद
काय म्हणाले राजू शेट्टी
सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक अशोक शिनगारे हा कार्यकर्ता पूर्वी आमच्या संघटनेत सक्रिय होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आम्हाला साथ दिल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. राजू शेट्टींच्या खुलाशावर सदाभाऊ खोत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन प्रत्यूत्तर दिले.
Previous Articleसह्याद्री माध्यमिक विद्यालय, भडगांव बु. स्कूलचा निकाल 100 टक्के
Next Article .. तर शाळा जिल्हा परिषदेत भरवणार- अंकुश जाधव









