Sada Sarvankar vs ShivSainik : धारावीमध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे. या प्रकरणी ठाकरे गटातील तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री ही घटना घडली. सदा सरवणकर यांची गुरुवारी रात्री पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. बैठक संपल्यानंतर सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर तीघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाकरे गटातील 35 ते 40 कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
नेमकं काय घडलं
देवीच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. ही बैठक संपल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. यातून राडा झाला. मात्र पोलीस घटनास्थळी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आज धारावी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवून या अन्यायाविरोधात आंदोलन करणार असल्याचे उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









