अध्याय अठरावा
भगवंत संन्यासश्रमाबद्दल बोलत होते ते म्हणाले, वैराग्याच्या जोरावर विघ्नांना लाथा हाणून साऱया देवांना बाजूस सारून आवश्य संन्यासग्रहण करावा. वैराग्याने संपन्न व विवेकज्ञानाने अत्यंत श्रे÷ असलेला पुरुष विधिपूर्वक संन्यास घेऊन वरि÷ म्हणजे पूज्य होऊन राहतो. अशा प्रकारे संन्यास ग्रहण केल्यानंतर त्याने विधीपूर्वक कसे वागावे ते संन्यासाचे स्वधर्मलक्षण स्वतः नारायण सांगत आहेत. तो देहमात्र राहिलेला दिसतो. बाकी त्याने पूर्वीच सर्वस्वाचा त्याग केलेला असतो.
जो गुरुवाक्मय श्रवणाबरोबर सहज ब्रह्मस्वरूप होऊन जातो आणि देहबुद्धीचा ठसा उडून जाऊन ज्याच्या कर्माचाही फासा तुटतो. त्याने शास्त्रविधीप्रमाणे वागणेसवरणेची गोष्टसुद्धा कधी बोलू नये कारण, लोणी हाताला आल्यानंतर मग रिकामे ताक घुसळीत कोण बसणार ? कापूर अग्नीला मिळाला, म्हणजे मग पुन्हा काही तो कापराच्या स्वरूपात यावयाचा नाही. त्याप्रमाणे गुरुवाक्मयश्रवणाने जो ब्रह्मरूप झाला तो काही विधिनिषेधाचा ताबेदार होऊन राहणार नाही. गुरुवाक्मयाचे श्रवण मनन करणे हे साधन जो साधतो, त्या साधकाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत. संन्याशाचे स्वाभाविक ध्यान म्हणजे ‘नारायण तो मीच’ हे होय. ही दृढतर भावना धरून त्याचे मन पवित्र होत असते.
आता संन्याशाचा स्वधर्ममुक्त आहारविहार, आचारविचार, जाणेयेणे, इत्यादिबद्दल सांगतो. संन्याशाने सात घरात भिक्षा मागून ते अन्न ग्रहण करावे. त्यावेळी कोण अन्न मागू लागला तर त्याला त्यातीलच काही भाग द्यावा. संन्याशाने सगळीकडे एकटय़ानेच फिरावे. कोठेही आसक्ती ठेवू नये. इंद्रिये ताब्यात ठेवावीत. आत्म्याशीच खेळावे. आत्मप्रेमातच तन्मय असावे, प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने वागावे आणि परमात्म्याला सगळीकडे समदृष्टीने पाहात राहावे. सदासर्वदा अंगामध्ये परिपूर्ण वैराग्य असावे. कोणा सोबत्याची इच्छा करु नये. मनाने निःसंग होऊन पृथ्वीवर आनंदाने फिरावे. संन्याशाने निर्जन पण निर्भय अशा एकांतात राहावे. माझ्यावरील प्रेमाने त्याचे हृदय विशुद्ध असावे. त्याने स्वतःला माझ्यापासून अभिन्न समजावे. त्याने आपल्या ज्ञाननि÷sने चित्ताचे बंधन आणि मोक्ष यासंबंधी विचार करावा व असा निश्चय करावा की, विषयोपभोगासाठी इंद्रियांचे चंचल होणे, हे बंधन आहे आणि त्यांना नियंत्रणाखाली ठेवणे, हाच मोक्ष होय. ऐक्मयस्वरूपाला पोहचून एकात्मता झाल्यानंतर बंधमोक्षाकडे पाहू लागले म्हणजे ते दोन्ही खरोखर मायिक व मिथ्याच भासू लागतात. बंध आणि मोक्ष हे प्रवृत्तीमध्येच असतात. त्या दोहोंचे भेद हेच की, इंद्रियांची विषयासक्तता याचे नांव दृढबंधन. आणखी उद्धवा! कायावाचामनेकरून निखालस विषयांची जी विरक्ती तीच खरोखर ‘मुक्ती’ असे समज.
ह्याकरिता ज्याला खरोखर मुक्ती पाहिजे असेल, त्याने विषयांची निवृत्ती केली पाहिजे. कृपेची केवळ मूर्ती जे श्रीकृष्ण ते मुख्यत्वेकरून त्याचाच उपाय सांगत आहेत. म्हणून संन्याशाने मन आणि पाचही इंद्रिये यांना जिंकावे, भोग हे क्षुद्र आहेत असे समजून त्यांच्याबाबत विन्मुख असावे आणि आत्म्यातच परम आनंदाचा अनुभव घ्यावा अशा प्रकारे माझ्याशी एकरूप होऊन राहावे. अशा दृष्टीने विचार करताना विषयासक्तीने दृढतर ‘बंधन’ प्राप्त होते. त्या विषयांचाच त्याग केला म्हणजे आपली ‘मुक्ती’ सहज सिद्ध आहे. पण तीच विषयाची विरक्ती आपल्या हाती कशी लागेल ? तर यासाठी साधकाने वैराग्य उत्पन्न होईल, तो तो यत्न करावा.
अंतःकरणामध्ये वासना दृढमूल असते तिला विषयरूप शाखा फुटून त्या माजतात याकरिता ती वासनाच समूळ छेदून टाकण्यासाठी कडकडीत वैराग्य साध्य करावे. स्वधर्मकर्म करून ते मला अर्पण करावे, हेच वैराग्यप्राप्तीचे मुख्य साधन आहे. कर्म करून त्याचे कर्तेपण सोडून देणे ह्याचंच नाव ‘मदर्पण’ होय.
मदर्पणबुद्धीने कर्म करू लागले म्हणजे माझ्यावर प्रेम उत्पन्न होते आणि चित्ताला माझेच नाम, माझीच कीर्ती आणि माझेच चिंतन घडू लागते.
क्रमशः







