आपले मृत्यूनंतर काय होते, हा प्रत्येकाच्या मनात उमटणारा प्रश्न आहे. हा गहन प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. मृत्यूपश्चातच्या जीवनावर अनेकांनी विविध मार्गांनी संशोधन केले आहे. तथापि, निश्चित निष्कर्ष काढणे कोणालाही जमलेले नाही. पण या जगात काही माणसे अशी आहेत, की जी मृत्यूच्या जबड्यातून परतलेली आहेत. अर्धजिवंत असणाऱ्या अवस्थेत आपल्याला जगाच्या पलिकडचे अनुभव आले आहेत, असे या लोकांचे म्हणणे असते. लिसा ब्लिझ या अमेरिकेतील महिलेने आपल असा अनुभव नुकताच कथन केला आहे.
ही महिला जेव्हा 10 वर्षांची होती, तेव्हा एका प्रसंगात साधारणत: 30 मिनिटे तिच्या प्राणाने तिच्या देहाचा त्याग केला होता, असे या महिलेचे प्रतिपादन आहे. ती तिच्या आजीआजोबंच्या घराबाहेर खेळत असताना तोल जाऊन बाजूच्या थंडगार नदीत पडली होती. ती जवळजवळ मृतवत झाली होती. अर्धा तास तिच्या प्राणाने तिचा देह सोडला होता आणि ती जीवनापालिकडच्या एका प्रवासाचा अनुभव घेत होती. आपला आत्मा एका अद्भूत प्रवासात होता, असे अनुभवकथन तिने स्वत:च केले आहे. अर्धा तास आपले प्राणविहीन शरीर नदीत पडले होते. पण आपला आत्मा एका अद्भूत प्रवासाला निघाला होता. तो एका रंगीत फुलांनी सजलेल्या मार्गावरुन निघाला होता. तो नंतर एका अत्यंत शांत आणि सुखी जगात पोहचला. या जगात पोहचण्यापूर्वी एका द्वाराजवळ तो पोहचला, ज्या द्वाराचे वर्णन तिने पौराणिक कथांमध्ये वाचले होते. नंतर तिच्या आत्म्याला एका अदृष्य शक्तीने मागे खेचले आणि तो आत्मा पुन्हा तिच्या निश्चेष्ट शरीरात प्रवेशला. द्वारापाशी एक व्यक्ती उभा होता. तो ईश्वर आहे, हे तिच्या आत्म्याला समजले. तथापि, तीन नंतर तिच्या त्या प्राणविहीन असस्थेतून पृथ्वीवर परतली, तेव्हा त्या ‘जिवंत’ स्थितीशी जुळवून घेणे तिला काहीकाळ असह्या झाले होते, असे तिने स्वत: स्पष्ट केले आहे. जेव्हा आपला आत्मा पुन्हा शरीरात प्रवेशला आणि तिला तिच्या काळनिद्रेतून जागृती प्राप्त झाली, तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्या चुलत भगिनीने तिला नदीतून बाहेर काढले आहे आणि तिच्या कुटुंबियांकडून तिच्यावर उपचार केले जात आहे. मात्र, तिच्या मृत्यूपश्चातच्या अवस्थेमुळे ती आजही मोहरुन उठते. मात्र, काही जणांच्या मते ती मृत झाली नव्हती. तर केवळ बेशुद्ध पडली होती आणि तिला आपण स्वर्गात पोहचल्याचा भास झाला असावा. मतमतांतरे पुष्कळ आहेत, पण एका अद्भूत प्रवासाचा अनुभव तिला मिळाला असून ती या अनुभवाच्या सत्यतेसंबंधी ठाम आहे, असे दिसून येत आहे.









