ऑनलाईन टीम/तरुण भारत
Sachin Vaze in Mmoney Laundering case: मनी लॉंड्रिग प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मनी लॉंड्रिग प्रकरणात वाझे यांचा जामीन मंजूर केला आहे. परंतु इतर प्रकरणात वाझे यांना न्यायालयीन कोठडी आहे, त्यामुळे तो तुरुंगातच राहणार आहेत.
सचिन वाझेने सीआरपीसी कलम ८८ अंतर्गत जामीन अर्ज केला होता. मात्र, त्याला जामीन दिल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असं ईडीने न्यायालयात म्हटलं होतं. मात्र, तरीही मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून निर्णय घेतला आहे. वाझेच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि एनआयए प्रकरण प्रलंबित आहे.
दरम्यान, मनी लॉंड्रिग प्रकरणासह अन्य आरोपाखाली तुरूंगात असलेले माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सचिन वाझे यांना जामीन दिल्यास ते पुराव्याशी छेडछाड करू शकतात, असं सांगत ईडीने वाझे यांच्या जामीनाला विरोध केला होता. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Court) सचिन वाझे यांना मनी लॉंड्रिग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना मनी लॉंड्रिग प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांचा मुक्काम तुरूंगातच राहणार आहे. कारण, वाझे यांना इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.
कोरोना काळात १०० कोटी रुपये वसुली गोळा करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. अनिल देशमुख यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात सचिन वाझेंनासुद्धा अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांनी आपल्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले असल्याचे सचिन वाझेंनी चौकशीमध्ये कबुल केलं होतं. तसेच या प्रकरणात त्याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला होता. सीबीआयनेही त्याच्या माफीच्या साक्षीदार अर्जावर सही केली होती.