सचिन, मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, जय शहा यांची उपस्थिती
प्रतिनिधी/ मुंबई
क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पुतळ्dयाचे 1 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर अनावरण झाले. यावेळी सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, बीसीसीआय सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला तसेच सचिनचे अनेक चाहते यावेळी उपस्थित होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम झाला.
दोन दशकाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर सचिनने शेवटचा 200 वा सामना आणि अंतिम कसोटी या वानखेडे स्टेडियमवर खेळली होती. तसेच पहिला रणजी सामना याच मैदानावर खेळल्याचे सचिनने सांगितले. कोच आचरेकर सरांची शिकवण, मार येथेच मिळाला होता. येथूनच माझे क्रिकेटचे करियर गंभीरपणे खेळणे सुरु झाले. अशा ठिकाणी माझा पुतळा होत आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असे सचिन यावेळी नमूद केले.
सध्या वर्ल्डकपचे वातावरण आहे. 2011 चा वर्ल्डकप फायनल याच स्टेडियमवर खेळला गेला. भारताने श्रीलंकेला हरवून 28 वर्षांनंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला होता. त्यापूर्वी कोणत्याचे यजमना संघाने आपल्या भूमीत वर्ल्डकप जिंकला नव्हता. तो पराक्रम भारताने करीत सचिनचे वर्ल्डकपचे स्वप्नही पूर्ण केले होते.









