वृत्तसंस्था / मेलबर्न
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मेलबर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) सदस्यत्व देण्याचे जाहीर केले आहे. सचिन तेंडुलकरने एमसीसीचे हे आमंत्रण स्वीकारले आहे. आता जागतिक क्रिकेट क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या एमसीसी क्लबचा सचिन हा मानद सदस्य म्हणून राहिल.
ऑस्ट्रेलियातील एमसीसी हा क्लब सर्वात जुना म्हणून ओळखला जातो. या क्लबची स्थापना 1838 साली करण्यात आली होती. एमसीसीकडून सचिनला सदस्यत्वाची ऑफर दिली गेली आणि सचिनने ती स्वीकारली आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर सचिन तेंडुलकरने 5 कसोटी सामन्यात 44.90 धावांच्या सरासरीने विक्रमी 449 धावा जमविल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ सचिनला यापूर्वी देण्यात आला आहे. सध्या मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू आहे.









