वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथे सुरु असलेल्या विश्व मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा मुष्ठीयौद्धा सचिन सिवाचने 54 किलो वजन गटात विजयी सलामी देताना माल्डोव्हाच्या नोव्हॅकचा पराभव केला.
पुरुषांच्या 54 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या लढतीत सचिनने माल्डोव्हाच्या नोव्हॅकचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेत अन्य वजन गटात गोविंद सहानी, नवीन हे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.









