जयपूर : राजस्थान कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राज्यातील बंडखोर काँग्रेस आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आमदारांनी पक्षाविरुद्ध बंड केल्याने पायलट यांनी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजस्थान कॉग्रेसमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. नवीन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे तक्रार करताना सचिन पायलट यांनी अप्रत्यक्षपणे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे.
“कॉंग्रेस कमिटीने निरीक्षण करून हे गैरशिस्तीचे प्रकरण असून पक्षाने तिघांना नोटिसा पाठवल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. पण काँग्रेसमध्ये सर्वांसाठी समान नियम असल्याने त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल” असे सचिन पायलट म्हणाले. तसेच या गैरशिस्तीवर कॉग्रस अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची स्तुती केल्याचे निदर्शनात आणल्यावर ते म्हणाले “गुलाम नबी आझाद यांचीसुद्धा स्तुती पंतप्रधानांनी केली होती. पण नंतर काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. असे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









