संशयितांच्या टोळीत एका वकीलाचा सहभाग
संशयितइचलकरंजी, चंदूर, शिवनाकवाडी, बेळगाव येथील राहणारे
लक्ष्मीपूरी पोलिसात गुन्हा दाखल
दोघा संशयित रात्री उशिरा पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर
शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून, साबळेवाडी (ता. करवीर) येथील एका तरुणाला पाच जणांच्या टोळीने ६ लाख रुपयाला गंडा घातला. या टोळीत चंदूर (ता. हातकणंगले) एका वकीलाचा सहभाग असून, त्याच्यासह पाच जणांविरोधी लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद अरूण शिवाजी पाटील (वय ३८, रा. साबळेवाडी, ता. करवीर) यांनी दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये अॅड. सारंग भिकाजी कुराडे, भिकाजी नामदेव कुराडे (दोघेही रा. चंदूर, ता. हातकणंगले), शिवाजी बाबूराव घेवडे (रा. विक्रमनगर, इचलकरंजी), मुर्तजा उर्फ सोनु मन्सूर नायकवाडी (रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ), मेहरून सरकावस (रा. बेळगाव) या पाच जणाचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा या पाच जणापैकी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण त्यांची नावे समजू शकली नाहीत.
फिर्यादी अरूण पाटील याच्याबरोबर झालेल्या ओळखीतून संशयीत पाच जणांच्या टोळीने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळतो, असे सांगितले. त्याच्या विश्वासावर त्यांने त्याच्याकडे ६ लाख रूपयांची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली. गुंतवणूकीनंतर त्याला कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे त्यांने या टोळीकडे गुंतवणूक केलेल्या पैश्याची मागणी केली. त्यावेळी पाच संशयितापैकी शिवाजी घेवडे, भिकाजी कुराडे, मुर्तजा उर्फ सोनु नायकवाडी या तिघांनी त्याला कोल्हापूरातील लक्ष्मीपूरी गुंतवणूक केलेले पैसे तीन महिन्यात परत करतो, याबाबत नोटरीराइजड करून दिले. या नोटरीराईजडची मुदत संपताच पुन्हा त्याने संशयिताकडे पैश्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी गुंतविलेली पैसे संशयित मेहरून सरकावस (रा. बेळगाव) याच्याकडे गुंतविल्याविषयी सांगितले. त्यावरून त्यांने त्याच्याकडे चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने ६ लाख रूपयांची गुंतवणूक आपल्याकडे केल्याचे सांगून, त्याने आपल्या हिस्स्याचे पैसे देण्याविषयी सांगितले. तरीही त्याला या पाच जणाच्या टोळीने गुंतवणूक केलेले ६ लाख रूपये परत दिले नाही. त्यामुळे या पाच जणाच्या टोळीने आपली फसवणूक केली आहे. ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांने याविषयी लक्ष्मीपूरी पोलिसात या पाच जणांच्या टोळीविरोधी फिर्याद दिली. पोलिसांनी या फिर्यादीची नोंद गांभीर्याने घेवून गुन्हा दाखल केला.
Previous Articleगर्भलिंग निदानप्रकरणी आणखीन एकास अटक
Next Article मालवणात मधुमेह तपासणी आणि औषध वाटप शिबीर संपन्न








