वृत्तसंस्था/ माद्रिद
माद्रिद खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाने एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकचा पराभव केला. माद्रिद टेनिस स्पर्धेतील साबालेंकाचे हे दुसरे विजेतेपद आहे. शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात साबालेंकाने स्वायटेकचा 6-3, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. हा सामना अडीच तास चालला होता. गेल्या जानेवारी महिन्यात साबालेंकाने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्याचप्रमाणे तिने 2023 च्या टेनिस हंगामात 29 वा सामना जिंकला आहे









