वृत्तसंस्था/ माद्रिद
येथे सुरु असलेल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक आणि बेलारुसची आर्याना साबालेंका यांनी महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.

या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात स्वायटेकने 12 व्या मानांकित कुडेरमेटोव्हाचा 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. स्वायटेकने या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. हा उपांत्य सामना 80 मिनिटे चलला होता. दुसऱ्या उपांत्य लढतीत बेलारुसच्या द्वितीय मानांकित साबालेंकाने ग्रीकच्या नवव्या मानांकित मारिया सॅकेरीचा 6-4, 6-1 असा पराभव करत आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. 2021 साली ही स्पर्धा जिंकणारी साबालेंका हिची अंतिम लढत आता पोलंडच्या स्वायटेकशी होणार आहे.
पुरुषांच्या विभागात अॅस्लन कॅरेटसेव्हने झीजेनचा 7-6 (7-3), 6-4, असा पराभव करत एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे.









