बर्लिन (जर्मनी)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या स्टुटगार्ट खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या आर्यना साबालेंकाने सलग तिसऱ्या वर्षी एकेरीची अंतिम फेरी गाठताना रशियाच्या पोटापोव्हाचा पराभव केला.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेती साबालेंकाने पोटापोव्हाचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. साबालेंकाने या स्पर्धेत यापूर्वी सलग दोनवेळा अंतिम फेरी गाठली पण तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2021 साली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने तर 2022 साली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकने पराभूत केले होते. आता या स्पर्धेत पोलंडची स्वायटेक आणि जेबॉर यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर साबालेंकाचा अंतिम सामना होईल.









