वृत्तसंस्था/ रोम
येथे सुरु असलेल्या इटालियन पुरुष आणि महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला विभागात बेलारुसच्या द्वितीय मानांकित साबालेंकाचे एकेरीतील आव्हान दुसऱ्या फेरीतच समाप्त झाले. अमेरिकेच्या सोफिया किनेनने साबालेंकाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. पुरुष विभागात बेल्जियमच्या डेव्हिड गोफिन तसेच डॅनियल अल्टमेयर यांनी आपले विजय नोंदविले.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात किनेनने साबालेंकाचा 7-6 (7-4) 6-2 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने स्लोनी स्टिफेन्सवर 6-4, 6-3 अशी मात करत तिसरी फेरी गाठली. माजी टॉप सिडेड प्लिसकोव्हाचे आव्हान दुसऱ्या फेरीतच समाप्त झाले. अॅना बाँडेरने प्लिसकोव्हावर 7-6 (7-5), 6-2, अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडने जेसिका पेगुलाचा 6-2, 3-6, 6-3, कॅरोलिनी गार्सियाने रुमानियाच्या बोगडेनचा 6-4, 3-6, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनने लुका नेर्डीचा 3-6, 6-4, 6-2, डॅनिल अल्टमेयरने झिपेरीचा 7-6 (7-3), 4-6, 6-0, मार्को सेचियांतोने मॅकेन्झी मॅकडोनाल्टचा 6-3, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.









