वृत्तसंस्था /माँट्रियल
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए आणि एटीपी टूरवरील महिलांच्या आंतरराष्ट्रीय कॅनेडियन खुल्या 2023 च्या टेनिस स्पर्धेत द्वितीय मानांकित साबालेंकाने पेत्रा मार्टिकचा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळवले. या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात साबालेंकाने मार्टिकचा 6-3, 7-6(7-5) असा पराभव केला. साबालेंका आणि 15 वी मानांकित सॅमसोनोव्हा यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. मार्टिक आणि साबालेंका यांच्यातील झालेल्या लढतीत दुसरा सेट 72 मिनिटे चालला होता. विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत साबालेंकाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ट्युनेशियाच्या जेबॉरकडून हार पत्करावी लागली होती. कॅनडातील या स्पर्धेत अन्य एका सामन्यात झेकच्या क्विटोव्हाने कॅमिला जॉर्जीचा 6-2, 5-7, 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. क्विटोव्हा आणि बेन्सिक यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल.









