वृत्तसंस्था/ बर्लिन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या बर्लिन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आर्यना साबालेंकाचे आव्हान उपांत्य फेरीत मर्केटा व्होंड्रोसोव्हाने संपुष्टात आणले. आता व्होंड्रोसोव्हा आणि चीनची वेंग झिनयु यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात व्होंड्रोसोव्हाने साबालेंकाचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. हा सामना 85 मिनिटे चालला होता. व्होंड्रोसोव्हाने 2023 साली विंम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीनच्या वेंग झिनयुने सॅमसोनोव्हाचा 6-4, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. वेंगने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.









